Monday, June 20, 2011


कुणा कुणाच्या आठवणी सांभाळत बसू
मनातील आक्रोश आवरत बसू
सहन करायचे आहेत वार अजुन हि बरेच
जुन्या जखमांना किती गोंजरत बसू
- महेश जाधव


शरीरं जाळून चूल पेटवण
या सारखी वाईट गरिबी नाही
आणि मन मारून जगत राहणे
या पेक्षा वाईट मरण नाही
- महेश जाधव


शांततेच्या मुक्या पणाचा
मला खूप राग येतो
मनातील आक्रोश ऐकू येतो
त्याचा मग त्रास होतो
- महेश जाधव


पौर्णिमेची रात्र असून ही
चांदण्याची चमचम मात्र नाही
त्यांना हि बहुतेक आता
माझे दुःख पाहवत नाही
- महेश जाधव


उन्हामुळे भेगाळलेल्या जमिनीवर
पाण्याच्या सहवासात हिरवळ पसरते
तिरस्कार मिळालेल्या माणसालाच
प्रेमाची किमत कळते
- महेश जाधव


अन्न पिकवणाराच आज
उपाशी पोटी मारतोय
कुणी विष पितोय
कुणी दोरखंडाला लटकतोय
- महेश जाधव


दुसर्याचे दुःख समजून घेण्याच्या
भानगडीत मी पडत नाही
त्यांच्या दुःखाशी तुलना करून
माझे दुःख मी वाढवत नाही
- महेश जाधव


रोज लाचार होऊन जगण्याची
मला हि खूप लाज वाटते
सोडून दिल असतं असं जगणं
पण मरणाची भीती हि खूप वाटते
- महेश जाधव


मी खूप स्वार्थी आहे
कुणालाहि माझं दु:ख देत नाही
आणि दिले तरी
माझं दु:ख काही कमी होत नाही
- महेश जाधव


मी एकदा स्वप्नात
सुख पहिले होते
आज मी दुखी आहे म्हणत
ते बिचारे खूप रडले होते
- महेश जाधव

tu aani me



तू आणि कागद
दोघांवर मी प्रेम करतो
तू मला सोडून गेलीस
तो आज ही मला सहन करतो
- महेश जाधव


श्वासांचे काय आहे
ते केव्हा हि सोडून जातील
तुझ्या आठवणी मात्र
मेल्यावर हि साथ देतील
- महेश जाधव

नसतील सोबत श्वास माझे
तुझ्या आठवणी सोबत नेईन
आकाशातील तारा होऊन
तुझी वाट पहात राहीन
- महेश जाधव


तूझी जर मला
साथ मिळाली असती
तर माझ्या हातावरील आयुष्याची रेषा
मध्येच अशी संपली नसती
- महेश जाधव


रात्री प्रेम करणारी तू
सकाळी मात्र दूर जातेस
स्वप्नात येने हि बंद केलेस
बहुतेक आता दुसर्याला वेळ देतेस
- महेश जाधव


पुरे आहे तुझे
मिटलेल्या पापण्यात येणे
दूर राहून हि तुझ
मला साथ देणे
- महेश जाधव


अस्ताला जाणारा सूर्य
किनार्यावरून शांतपणे पहाताना
आठवतं मला असच पाहिले मी
तुला ही दूर जाताना
- महेश जाधव