माझ्या चारोळ्या
Friday, August 12, 2011
वाळुत हात फिरतात
किती हि झटकले तरी
काही कण चिकटतात
तुझी आठवण हि तशीच आहे....
....वाळुच्या कणान सारखी...
- महेश जाधव
ती आता माझी नाही
तिने माझ असाव
असं माझ्यात हि
काही उरल नाही
- महेश जाधव
सताविते मला ती
आठविते मला ती
उन्हात भिजवीते
पावसात कोरड करते.....मला ती
- महेश जाधव
इथे तमा कुणास
खवळलेल्या सागराची
त्याला सवय आहे
माझ्या डोळ्यातून वाहायची
महेश जाधव
तुझा भास होणे
मागे फिरुन पहाणे
आणि तु तिथ नसने
साल नेहमिचच झालय
- महेश जधाव
आधार हा बांडगुलास,
वरदाना परी वाटावा
पण आश्रिताच ओझं,
झाडाने किती सोसावे?
- महेश जाधव
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Comments (Atom)