Monday, March 19, 2007



तुझ्यासाठी रोजच मी
चारोळी लिह्ण्याचं ठरवतो
पण तुझी आठवण येते
आणि हातच लिहायचा थांबतो.
- महेश जाधव

पाण गळताना झाडाला
दुःख होत असेल का?
मला सोडुन गेल्यावर
तुला झालं होत का?
- महेश जाधव

तुझ्या अश्रुंच्या धारेन
माझ्या मनाचं अंगण पार ओळं केलस
जवळ येवुन चिंब भिजवलस
आणि दुर जावुन कोरडं केलस
- महेश जाधव

भोवताली अनेक जण मला
त्रासलेले दिसतात
जीवनात येणारं अपयश पचवत
जनू ती जगत असतात
- महेश जाधव

मी ही आता स्वतःचं
अस्तित्व निर्माण करतोय
दुसर्यांच्या मदतिच्या कुबड्यां पासून
स्वतःला वेगळं करतोय
- महेश जाधव

अशा ह्री मानसाला
अंधारातील किरण भासते
आशा बाळगूनच ह्र्दय
लाख जख्मा ही सहन करते-
महेश जाधव

डोळ्यात अश्रू दाटले कि
मी लगेच एकांत शोधतो
भरुन आलेल्या आभाळाला
मनसोक्त बरसु देतो
- महेश जाधव

माझ्या घराला मी
कधीच कुलुप लावित नाही
घर तर दुःखानेच भरलय
आणि दुःख कोणचं चोरत नाही
- महेश जाधव

नाटकात मला रडताना पाहून
लोकांनी माझा नटसम्राट केला
हसण्याची जेव्हा वेळ आली
माझ्यातला कलाकारच मेला
- महेश जाधव

मी ज्या वाटेवरुन चालतोय
त्यावर काटेच पेरले आहेत
माझ्या वाटेवर काटे पेरुन
माझे आपलेच गेले आहेत
- महेश जाधव

अंधाराचा मला त्रास होत नाही
उजेडच मला सतवितो
अंधारात दडलेलो मी
उजेडात मात्र उघडा पडतो
- महेश जाधव

शेवटच्या क्षणी मेणबत्ती
जास्तच त्वेषाणे पेटली
दुसर्यांसाठी शेवटपर्यंत जळायचं
हेच सांगत ती विझली
- महेश जाधव

नात्याचं बंधन नाजूक असतं
त्यावर विश्वासाचं पांघरून घातलं पाहीजे
परिस्थिती कितीही वाईट असली
तरी विश्वास कायम राहीला पाहीजे
- महेश जाधव

ह्रदयावरील जख्मा ही भरल्या जातात
काही काळ जाऊ द्यावा लागतो
दुःखा नंतर सुख ही येतं
थोडा धीर धरावा लागतो
- महेश जाधव

सभोवतालचा अंधार दूर करण्यासाठी
मी वणवा होऊन पेटलो
काही काळ अंधार दूर झाला ही
मी मात्र कायमचा विझलो
- महेश जाधव

शब्द अनमोल आहेत
ती जपून वापरायची असतात
फ़ळ्यावरील पुसता येतात
मनातील मात्र कायम राहतात
- महेश जाधव

जग सोडून जाण्याचा
नेहमी विचार करतो
तुमची आठवण येते
आणि मी पुन्हा मागे फ़िरतो
- महेश जाधव



कुणालाही सांगु नका
पाखरांची किलबिल मला आवडते
आवडणार्या गोष्टीवर सरकारा
मनोरंजन टैक्स लावते - महेश जाधव

वार्याच्या दिशेनचं वाहायचं
मला कधी कळळचं नाही
मी मोडतच राहिलो
वाकणं कधी जमलचं नाही
- महेश जाधव


जीवनात बर्याच गोष्टी मी
निमूटपणे सहन केल्या
आता कशाचाच त्रास होत नाही
कारण संवेदनाच माझ्या मेल्या
- महेश जाधव


गावाच्या वेशीवर
पाउल बाहेर टकताना
मी पाहिलं मागं वळुन
गाव माझा रडताना
- महेश जाधव


कुणाच्या बा चं काय जातं
इंडिया शायनिंइ म्हणायला
इथं रक्ताच पाणी होत
अर्ध पोट ही भरायला
- महेश जाधव

लबाड दुनियेत एक
लबाडी मी ही शिकलो आहे
दुःखी आयुष्याच्या पुस्तकावर
सुखाचं लेबल चिटकवलं आहे
- महेश जाधव


वीज कितीही गरजली तरी
मला कधीच शिवत नाही
मला वाटतं ती ही कधी
मेलेल्याला मारत नाही
- महेश जाधव

पाण्यावरती कमळ तरंगतात
दगड मात्र तळ गाठतात
काही माणसं सोडुन जातात
मनात मात्र कायम रहातात
- महेश जाधव

इतरांच्या मताचा विचार
मी आता करीत नाही
अंधार झाल्या शिवाय
मी घरा बाहेर पडत नाही
- महेश जाधव

मनावरील वाळवीच साम्राज्य
आता मला मान्य आहे
पोखरू दे मला आतून बाहेरून
जीवनच माझं शून्य आहे
- महेश जाधव

घड्याळा वरील जिवनात
वेळच आता पैसा झाली
सुख-चैनीच्या शर्यतीत
नाती-गोती दूरच राहिली- महेश जाधव

उंच उंच ईमारती वरुन
कौतुकान नजर फ़िरवताना
डोळे भरुन येतात
झोपडीत डोकावताना
- महेश जाधव

कोसळणारा पाऊस पाहुन
मला नेहमीच एक प्रश्न पडतो
माझं तर ठीक आहे
पण हा कुणासाठी रडतो
- महेश जाधव

गुलाबाला किंमत मोजतात
देठाला इथं कोण विचारतो
केसात मात्र गुलाब माळताना
देठाचाच आधार घेतो
- महेश जाधव

आयुष्यावर मी
कधीच काही लिहित नाही
आयुष्य म्हणजे नक्की काय
हेच मला माहीत नाही
- महेश जाधव

दुसर्याचे अश्रु पाहून
मी आता बेचैन होत नाही
मी किती ही रडलो तरी
अश्रु कोणी पुसत नाही
- महेश जाधव

सापांचा डसाण्याचा गुणधर्म
माणसांच्या अंगी भिनलाय
ज्यांनी संकटात साथ दिली
त्यालाच तो डसलाय
- महेश जाधव

मनापासून मनापर्यंत
पुल मला बांधायचाय
एक मन आहे माझ्या जवळ
दुसरे मला शोधायचंय
- महेश जाधव

मानसाला मेल्यावरती
नवा जन्म मिळतो म्हणतात
पण इथे मेल्यावर ही जिवंत आहेत
त्या मुडद्यांचे काय?
- महेश जाधव

कुणासाठी अश्रु गाळावे?
हाच प्रश्न उरलाय
पण अश्रु गाळुन तरी
कुणाचा प्रश्न सुटलाय?
- महेश जाधव

चालता चालता ठेच लागली
तर त्या दगडाला दोष देवु नका
तो तर शेवटी दगडच,
तुम्ही डोळे बंद करुन चालु नका.
- महेश जाधव

सागरातील कित्येक लाटा
अर्ध्यावरच अस्तित्व गमवतात
पण ज्या काही किनार्यापर्यंत पोहचतात
त्याही पुन्हा सागरातच मिसळतात
- महेश जाधव




माणसांपेक्षा मला
घराच्या भिंतीच जवळच्या वाटतात
मी काही ही बोललो तरी
त्या शांतपणे ऐकून घेतात
- महेश जाधव

माणसं नेहमी
उंचावर जाण्याचा
प्रयत्न करीत असतात
उंचावर जाताना मात्र
खोळ दरी ही निर्माण करतात
- महेश जाधव

सौंदर्याच्या परिभाषेत

माझं शरिर बसत नाही
मन सुंदर असुन काय उपयोग?
ते तर कुणिच पहात नाही
- महेश जाधव

माणसांच्या गर्दित जेव्हा

परकेपणाची जाणिव झाली
एकटा राहुन मग मी
एकांताशीच मैत्री केली
- महेश जाधव

माणसांच्या पाप-पुण्याचा हिशोब

आता देव ही करित नसेल
माणसाच्या नावावर आता
'पापी' अशीच नोंद होत असेल
- महेश जाधव

प्रेमाचा खरा अर्थ

माणसाला कुठे कळ्तो
त्याचा स्वार्थ साधला की
तो दुसर्या प्रेमाकडे वळतो
- महेश जाधव