कोळ्याच्या जाळ्याकडे
मी कौतुकाने पाहून म्हणालो
सालं ह्याला हि जमत घर बांधायला
आपण फक्त स्वप्नं पाहत राहिलो
- महेश जाधव
मी असाच आहे
कोरडेपणाचे दु:ख जाणणारा
शस्त्राचा द्वेष अन
जखमांना साथ देणारा
- महेश जाधव
लाचार होऊन सांभाळतात ते
नाती आणि मैत्र हि
कळलेच नाही त्यांना जगणे
अन त्याचा अर्थ हि
- महेश जाधव
माणसांच्या मनाची
लांबी-रुंदी कमी झाली
प्रेम हि मोजुन घ्यावे-द्यावे
भावनांची सारी गणिते झाली
- महेश जाधव
जिच्यावर प्रेम होते
तिच्यासाठी फक्त तो व्यवहार होता
ज्याच्या विश्वासावर वाळवंटात उतरलो
तो फक्त मृगजळाचा भास होता
- महेश जाधव
चारभिंती मधले भांडण
शब्दानो रस्त्यावर मांडू नका
दाबली वादळे ह्रदयातील
कवितेत सांडवु नका
- महेश जाधव
काट्यांना पाय फुटलेले
मला शोधता, हसुन टोचलेले
मी हि जपले त्यांना
सोबतीस माझ्या घेतलेले
- महेश जाधव
स्वप्नातील सावळ्या
सत्यात उतरलेल्या
सूर्य डोईवर असताना
पायात अडकून पडलेल्या
- महेश जाधव
अरे नुसतेच कोसळतोस काय
थोडं तरी भिजव मला
...कळत नाही मला
तुझ्यातला ओलावा कमी झालाय
की माझ्यातला कोरडे पण वाढलाय
- महेश जाधव
मी कधी कुणाची आशा बाळगली नाही
अन कुणाच्या निराशेत भागीदार हि झालो नाही
मी प्रकाशाला हि माझ्या कुंपण घातलेले
दुसर्यांसाठी वात होऊन कधी जळत राहिलो नाही
- महेश जाधव
No comments:
Post a Comment