स्पर्श ते हळुवार, मज सांगून गेले काही
दु:ख ते अंतरीचे, स्पर्श मांडून गेले काही
नको म्हणता म्हणता.. झालाच पसारा भावनांचा
अश्रु ते एकांतात, ओघळून गेले काही?
- महेश जाधव
ती दुर्गंधी गर्वाची होती
जी मनाच्या चुलीवर ऊतु जात होती
डोळे उघडुन पहिलेच नाही कधी
अन आपली माणसे दूर जात होती
- महेश जाधव
वाटल होत घर आपलेच आहे
बिनदिक्कत प्रवेश करावा
दारातल कुत्र भुंकल्यावर लक्षात आले
ह्या घराला आपण अनोळखी आहोत
- महेश जाधव
काट्यांना पाय फुटलेले
मला शोधता, हसुन टोचलेले
मी हि जपले त्यांना
सोबतीस माझ्या घेतलेले
- महेश जाधव
केले वार त्यांनी निष्ठुरपणे जरी
मी दगड वितळुन काळजात ओतलेला
लक्तरं फक्त शरिराची झाली
घाव त्यांचा काळजापर्यंत कुठे पोचलेला
- महेश जाधव
भेटली मला माणसे बरिच
पण माणूस भेटला नाही
शोधतोय असा मनाचा डोह
जो अजुन तरी आटला नाही
- महेश जाधव
काल रात्रि मद्याच्या प्याल्यात घोळुन...
आत्म्याच्या स्मशानात गाडलेल्या आठवणींनी...
नशा सरताच...
पुन्हा माझ्यावर हल्ला चढविला
- महेश जाधव
किती प्रताडणा करावी
मनीच्या भावनांची
त्यांना सुद्धा ओकुदया गरळ
दाबलेल्या अश्रूंची
- महेश जाधव
जमाने से लढते रहे
अपनोंसे हारते रहे
फिर भी गम नहीं जिंदगी से
किसी के तो काम आते रहे
- महेश जाधव
शब्दांना धार यावी म्हणून
ते बोथट दगडावर पाजालायचे नसतात
तावून-सलाखून निघालेले शब्दच
चांगली कविता जन्माला घालतात
- महेश जाधव
मी आता मलाच
काही गोष्टी शिकवतोय
माणुसकीला फाटा देऊन
निर्लज्जपणा अंगिकारतोय
- महेश जाधव
एकाच मातीची बनलेली
तरी माणसे वेग-वेगळी
जात-पात, देव-धर्मासाठी
माणुसकी विसरलेली
- महेश जाधव
माणसांचा खोटारडेपणा
मला लवकर कळतो
सोडली अशी माणसे की
माणुसकी नसल्याचा आरोप होतो
- महेश जाधव
No comments:
Post a Comment