Friday, September 23, 2011

स्पर्श ते हळुवार, मज सांगून गेले काही
दु:ख ते अंतरीचे, स्पर्श मांडून गेले काही
नको म्हणता म्हणता.. झालाच पसारा भावनांचा
अश्रु ते एकांतात, ओघळून गेले काही?
- महेश जाधव
ती दुर्गंधी गर्वाची होती
जी मनाच्या चुलीवर ऊतु जात होती
डोळे उघडुन पहिलेच नाही कधी
अन आपली माणसे दूर जात होती
- महेश जाधव
वाटल होत घर आपलेच आहे
बिनदिक्कत प्रवेश करावा
दारातल कुत्र भुंकल्यावर लक्षात आले
ह्या घराला आपण अनोळखी आहोत
- महेश जाधव
काट्यांना पाय फुटलेले
मला शोधता, हसुन टोचलेले
मी हि जपले त्यांना
सोबतीस माझ्या घेतलेले
- महेश जाधव
केले वार त्यांनी निष्ठुरपणे जरी
मी दगड वितळुन काळजात ओतलेला
लक्तरं फक्त शरिराची झाली
घाव त्यांचा काळजापर्यंत कुठे पोचलेला
- महेश जाधव
भेटली मला माणसे बरिच
पण माणूस भेटला नाही
शोधतोय असा मनाचा डोह
जो अजुन तरी आटला नाही
- महेश जाधव
काल रात्रि मद्याच्या प्याल्यात घोळुन...
आत्म्याच्या स्मशानात गाडलेल्या आठवणींनी...
नशा सरताच...
पुन्हा माझ्यावर हल्ला चढविला
- महेश जाधव
किती प्रताडणा करावी
मनीच्या भावनांची
त्यांना सुद्धा ओकुदया गरळ
दाबलेल्या अश्रूंची
- महेश जाधव
जमाने से लढते रहे
अपनोंसे हारते रहे
फिर भी गम नहीं जिंदगी से
किसी के तो काम आते रहे
- महेश जाधव
शब्दांना धार यावी म्हणून
ते बोथट दगडावर पाजालायचे नसतात
तावून-सलाखून निघालेले शब्दच
चांगली कविता जन्माला घालतात
- महेश जाधव
मी आता मलाच
काही गोष्टी शिकवतोय
माणुसकीला फाटा देऊन
निर्लज्जपणा अंगिकारतोय
- महेश जाधव
एकाच मातीची बनलेली
तरी माणसे वेग-वेगळी
जात-पात, देव-धर्मासाठी
माणुसकी विसरलेली
- महेश जाधव
माणसांचा खोटारडेपणा
मला लवकर कळतो
सोडली अशी माणसे की
माणुसकी नसल्याचा आरोप होतो
- महेश जाधव

बंद कमरे में रहकर उनसे दूरिया बनाई हमने
कम्बक्त ये हवा हमारा हाल उन तक पहुंचती रही
- महेश जाधव
वो अपने दर्द से दुखी है...कोई बतायें उन्हें...दर्द हमारे हालात पर रोता है - महेश जाधव
तेरे यादों को, दुर समंदर मे फेंक आया था
पता नहीं कैसे जालिम, मुझे ढुंढते हुए फिर किनारे पर आई
- महेश जाधव
बेवाफाई कर हँस रहे थे वो, हम भी खुश थे कि मौत से पहले असलियत देख ली - महेश जधाव
दुरिया सुकुन देती हमे, तो अश्कों कि जरुरत न होती - महेश जधाव
हमारी दास्तां कोई उन्हे भी सुनाए, जिन्हे लगता है हम दिल से नावाकिफ़ है - महेश जधाव

Wednesday, September 7, 2011

कोळ्याच्या जाळ्याकडे
मी कौतुकाने पाहून म्हणालो
सालं ह्याला हि जमत घर बांधायला
आपण फक्त स्वप्नं पाहत राहिलो
- महेश जाधव
मी असाच आहे
कोरडेपणाचे दु:ख जाणणारा
शस्त्राचा द्वेष अन
जखमांना साथ देणारा
- महेश जाधव
लाचार होऊन सांभाळतात ते
नाती आणि मैत्र हि
कळलेच नाही त्यांना जगणे
अन त्याचा अर्थ हि
- महेश जाधव
माणसांच्या मनाची
लांबी-रुंदी कमी झाली
प्रेम हि मोजुन घ्यावे-द्यावे
भावनांची सारी गणिते झाली
- महेश जाधव
जिच्यावर प्रेम होते
तिच्यासाठी फक्त तो व्यवहार होता
ज्याच्या विश्वासावर वाळवंटात उतरलो
तो फक्त मृगजळाचा भास होता
- महेश जाधव
चारभिंती मधले भांडण
शब्दानो रस्त्यावर मांडू नका
दाबली वादळे ह्रदयातील
कवितेत सांडवु नका
- महेश जाधव
काट्यांना पाय फुटलेले
मला शोधता, हसुन टोचलेले
मी हि जपले त्यांना
सोबतीस माझ्या घेतलेले
- महेश जाधव
स्वप्नातील सावळ्या
सत्यात उतरलेल्या
सूर्य डोईवर असताना
पायात अडकून पडलेल्या
- महेश जाधव
अरे नुसतेच कोसळतोस काय
थोडं तरी भिजव मला
...कळत नाही मला
तुझ्यातला ओलावा कमी झालाय
की माझ्यातला कोरडे पण वाढलाय
- महेश जाधव
मी कधी कुणाची आशा बाळगली नाही
अन कुणाच्या निराशेत भागीदार हि झालो नाही
मी प्रकाशाला हि माझ्या कुंपण घातलेले
दुसर्यांसाठी वात होऊन कधी जळत राहिलो नाही
- महेश जाधव

मरणावर रडणार नाही
त्याचीच वाट पाहणार
जगण्यातील घालमेल
आता तोच सोडवणार
- महेश जाधव

मोजकेच श्वास माझे
ते हि उधार घेतलेले
बाहेरचे दु:ख त्यांनी
काळजात पेरलेले
- महेश जाधव

परतफेड करायची आहे
काळजावरल्या घावांची
आठवण तर ठेवावीच लागेल
जख्मांची आणि त्या देणार्यांची
- महेश जाधव

नाही मागत तुझ्याकडे
क्षण अधोरेखित सुखाचे
पुसतोय त्या आठवणी
अश्रु गाळून मनाचे
- महेश जाधव

झाडाविना कळी फुलताना
मी खुपदा पाहिलंय
सुकलेल्या झाडाला पालवी फुटताना
तिच्या सहवासात अनुभवलय
- महेश जाधव

खुड्लेल्या कळीचे
भंगलेले ते स्वप्न होते
खुड्लेल्या हातानाही
तिला खुडण्याचे दु:ख होते
- महेश जाधव

मी केलेली चूक
तिला सुख देऊन गेली
मी मुद्दामच चाललेली चाल
तिला जिंकवून गेली
- महेश जाधव

भविष्या वर विश्वास ठेऊन
डाव खेळायचा नसतो
वेळ आल्यावर कळते
कुणी-कुणाचा नसतो
- महेश जाधव

मी ठेऊन विश्वास आपल्यांवरती
उचलले पाऊन वाटेवरती
आपल्यानीच पेरले होते ते काटे
कळले पायास टोचल्यावरती
- महेश जाधव

ती नसण्याची सळ
मनात माझ्या रुतून आहे
मेघ नाहीत ते डोळे माझे
बरसला तो जिथून आहे
- महेश जाधव

स्वप्नातली ती
सत्यात जेव्हा उतरेल
आकाशी चंद्र तो
ओंजळीत माझ्या असेल
- महेश जाधव

होऊ दे कोरडे त्यांना
ओलाव्याचा त्रास झालाय
पुसायला त्यांना
कुणाचा हाथ पुढे झालाय
- महेश जाधव

तिच्या आठवणी मला छळतात
नको म्हटले तरी साथ देतात
त्रास जरी झाला त्यांचा
त्या आठवणीच मला जगवतात
- महेश जाधव

मैत्रीची सीमा ओलांडून
ती त्याच्या प्रेमात पडली
सुख-दुखाची चव
दोघांनी हि वाटून घेतली
- महेश जाधव

तुझ्यासाठी आणलेल्या चांदण्या
शापित निघाल्या
जाळुन त्याचे सर्वस्व
पुन्हा आभाळास मिळाल्या
- महेश जाधव

चांदण्यांचा मोह करू नये
त्या दुरूनच चांगळ्या दिसतात
जवळ गेल्यावर कळत
त्या तर फक्त दगड असतात
- महेश जाधव

तु दिलेला पाउस
अजून हि मला ओलं करतो
डोळ्यातून बघ माझ्या
अवेळी बरसतो
- महेश जाधव


Friday, August 12, 2011

वाळुत हात फिरतात
किती हि झटकले तरी
काही कण चिकटतात
तुझी आठवण हि तशीच आहे....
....वाळुच्या कणान सारखी...
- महेश जाधव
ती आता माझी नाही
तिने माझ असाव
असं माझ्यात हि
काही उरल नाही
- महेश जाधव
सताविते मला ती
आठविते मला ती
उन्हात भिजवीते
पावसात कोरड करते.....मला ती
- महेश जाधव