Saturday, February 10, 2007



माझ्या ओळीच सांगतील तुला
मी किती असह्य जगतोय
तुझ्या शिवाय जगताना
क्षणो क्षणी मरतोय
- महेश जाधव

YYYYYYYY

आता नाही सहन होत हा दुरावा
एकदा तरि परत ये
एकदाच परत येवून
कायमचं जवळ घे
- महेश जाधव

YYYYYYYY

मैंने देखा हे उसके आंखों में
हमारे सपनों को टुटते हुए
रेत में बने आशियाने को
लहरों में घुलते हुए
- महेश जाधव

YYYYYYYY

अश्कों से ही लिखनी थी मेरी तकदीर
तो कम से कम इतना किया होता
जिस्म भले कांच का बनाते
दिल तो पत्थर का दिया होता
- महेश जाधव
YYYYYYYY
प्यार के बिछडने का गम
बहुत गहरा होता हॅ
एहसास-ए-मौत का फ़साना
वहीं से शुरू होता हॅ
- महेश जाधव 



जागतात स्वप्न काही अजुन ही
आहे वोलावा उशास अजुन ही
पापण्यात तु तशीच अजुन ही
चन्द्र तुझा उदास अजुन ही
- महेश जाधव


आठवण येते म्हणुन
मी रुमाल जवळ ठेवतो
ओल्या रुमालास
तुझ्या आठवणी सोपवतो
- महेश जाधव


पापण्यातील स्वप्न
अश्रून सोबत वाहून जातात
काही माणस अशी दूर जातात

बहरता बहरता झाड
पानं-फुले सुकून जातात
काही माणसं अशी दूर जातात
- महेश जाधव


माझेच प्रश्न आणि माझीच उत्तर होती
माझ्या स्वप्नाची टांगली मीच लक्तरं होती
- महेश जाधव


केले आरोप जरी त्यांनी, मी कुठे सवाल केला
माझ्या हसण्यावर हि आज त्यांनी बवाल केला
कुठे होते त्यांना मोल माझ्या आसवांचे
अश्रुंनी त्यांच्या माझा नेहमी रुमाल केला
- महेश जाधव


मी जगतोच कुठे, तरी जगतोच आहे
चांदण्यात सूर्य कधीचा शोधतोच आहे
उकिरड्यावर पडली कधी कुठे रत्न होती
कचर्याचे ढीग तरी उपसतोच आहे
- महेश जाधव




केले वार त्यांनी निष्ठुरपणे जरी
मी दगड वितळुन काळजात ओतलेला
लक्तरं फक्त शरिराची झाली
घाव त्यांचा काळजापर्यंत कुठे पोचलेला
- महेश जाधव

अहंकाराचा सागर आणि
माणसं बेटा सारखी विखुरलेली
मनाचा दुरावा तरी
नात्यांच्या बंधनात बांधलेली
- महेश जाधव

नाती जपण्याचा अट्टाहास
मी आयुष्यभर पुरवला
खर सांगतो...जगताना
नात्यांचाच जास्त त्रास झाला
- महेश जाधव

No comments: