
आज पुन्हा तुझी आठवण आली
आणि मी उगीच हसू लागलो
खोटं खोटं हसताना
कळलेच नाही कधी रडू लागलो
- महेश जाधव
==========
तुझ्या मिठीतील सुखं
पचवायचं राहून गेलं
तू कायम मिठीत रहा हे
सुचवायचं राहून गेलं
- महेश जाधव
==========
आठवतं का तुला
तुझं मला पाहुन लाजनं
आणि डोळ्यांच्या कोणातून
हळुच मला पहाणं
- महेश जाधव
==========
तुझ्या मनात जर मला
डोकावता आलं असतं
तर तुझं दुःख मला
माझं करता आल असतं
- महेश जाधव
- महेश जाधव
==========
हातावरती मेहंदी सजता
नातु कीती रडत होतीस
आपल्या प्रेमाची आठवण
अश्रुंने तु पुसत होतीस
- महेश जाधव
No comments:
Post a Comment