Sunday, February 18, 2007


मी प्रयत्न करतो स्वतःला
कशात तरी रमविण्याचा
ओघळणार्या अश्रूंचा झरा
काही काळ तरी थंबविण्याचा
- महेश जाधव

==========
तुला विसरणं खरंच आता
अशक्य आहे
माझा भूत, वर्तमान आणि भविष्यकाळ ही
तुझ्याच आठवणिने भरला आहे
- महेश जाधव


==========

तुझ्यासाठी काय लिहू
शब्द ही कमी पडु लागलेत
तुझ्यासाठी रडता रडता
अश्रु ही दाटु लागलेत
- महेश जाधव


==========

भर दुपारी सूर्यबिंब पहाताना
डोळ्यातून माझ्या पाणि आले
तुझी आठवण जे रोज करते
आज सूर्याने ही ते केले
- महेश जाधव


==========

दूर उडून गेला तरी
गंध फ़ुलाचाच रहातो
तू दुर गेलीस तरी
मी तुझीच वाट पहातो
- महेश जाधव


==========

जीवन माझे रात्र झाली
ती आता सरणार नाही
अंधार आता कायम राहणार
जो पर्यंत तू येत नाही
- महेश जाधव




No comments: