
फ़ुलपाखरा सारखा फ़िरणारा मी
तुझ्यावर मात्र स्थिरावलो
तुझ्या प्रेमात पडलो
आणि स्वतःलाच विसरलो
- महेश जाधव
=========
आठवतं मला माझ्या स्पर्शाने
तुझ्या शरीराचं शहारणं
तुझं नको नको म्हणताना
हळुचं मला बिळगन
- महेश जाधव
=========
आपल्या दोघांमधील शर्यत
नेहमी बरोबरीतच सोडवायचिस
मी तुला हरवणार नव्हतोच
आणि तुही नाही जिंकायचिस
- महेश जाधव
=========
मित्रांना प्रेयसिच्या डोळ्यात
नेहमी नक्शत्रचं दिसायचं
तुझ्या डोळ्यात मात्र
माझंच रुप असायचं
- महेश जाधव
=========
तुझ्याशिवाय जगण
आयुष्यातील अस वळण आहे
ज्यावरचं प्रत्येक पाऊल
माझ्यासाठी मरणं आहे
- महेश जाधव
=========
रोज डे च्या दिवशी
मी तुझ्याकडे गुलाब मागीतलं
तू हसून म्हणालीस
मी स्वतःला कधीच तुला सोपवलं
- महेश जाधव
=========
तुझ्या डोळ्यातील काजळ मी
तुझ्याच गाळावर लावायचो
माझीच तुला नजर लागेल
यालाच मी घाबरायचो
- महेश जाधव
=========
दव पडलेल्या गवतावरून
जेव्हा मी हात फ़िरवतो
तुझे अश्रू पुसतोय
आसाच मला भास होतो
- महेश जाधव
=========
लाल तुझ्या ओठांवर
गुलाबाला ही राग येत असेल
तुझे ओठ पाहुन तो
मनो-मनी रडत असेल
- महेश जाधव
No comments:
Post a Comment