
तुझ्यासाठी रोजच मी
चारोळी लिह्ण्याचं ठरवतो
पण तुझी आठवण येते
आणि हातच लिहायचा थांबतो.
- महेश जाधव
पाण गळताना झाडाला
दुःख होत असेल का?
मला सोडुन गेल्यावर
तुला झालं होत का?
- महेश जाधव
तुझ्या अश्रुंच्या धारेन
माझ्या मनाचं अंगण पार ओळं केलस
जवळ येवुन चिंब भिजवलस
आणि दुर जावुन कोरडं केलस
- महेश जाधव
भोवताली अनेक जण मला
त्रासलेले दिसतात
जीवनात येणारं अपयश पचवत
जनू ती जगत असतात
- महेश जाधव
मी ही आता स्वतःचं
अस्तित्व निर्माण करतोय
दुसर्यांच्या मदतिच्या कुबड्यां पासून
स्वतःला वेगळं करतोय
- महेश जाधव
अशा ह्री मानसाला
अंधारातील किरण भासते
आशा बाळगूनच ह्र्दय
लाख जख्मा ही सहन करते-
महेश जाधव
डोळ्यात अश्रू दाटले कि
मी लगेच एकांत शोधतो
भरुन आलेल्या आभाळाला
मनसोक्त बरसु देतो
- महेश जाधव
माझ्या घराला मी
कधीच कुलुप लावित नाही
घर तर दुःखानेच भरलय
आणि दुःख कोणचं चोरत नाही
- महेश जाधव
नाटकात मला रडताना पाहून
लोकांनी माझा नटसम्राट केला
हसण्याची जेव्हा वेळ आली
माझ्यातला कलाकारच मेला
- महेश जाधव
मी ज्या वाटेवरुन चालतोय
त्यावर काटेच पेरले आहेत
माझ्या वाटेवर काटे पेरुन
माझे आपलेच गेले आहेत
- महेश जाधव
अंधाराचा मला त्रास होत नाही
उजेडच मला सतवितो
अंधारात दडलेलो मी
उजेडात मात्र उघडा पडतो
- महेश जाधव
शेवटच्या क्षणी मेणबत्ती
जास्तच त्वेषाणे पेटली
दुसर्यांसाठी शेवटपर्यंत जळायचं
हेच सांगत ती विझली
- महेश जाधव
नात्याचं बंधन नाजूक असतं
त्यावर विश्वासाचं पांघरून घातलं पाहीजे
परिस्थिती कितीही वाईट असली
तरी विश्वास कायम राहीला पाहीजे
- महेश जाधव
ह्रदयावरील जख्मा ही भरल्या जातात
काही काळ जाऊ द्यावा लागतो
दुःखा नंतर सुख ही येतं
थोडा धीर धरावा लागतो
- महेश जाधव
सभोवतालचा अंधार दूर करण्यासाठी
मी वणवा होऊन पेटलो
काही काळ अंधार दूर झाला ही
मी मात्र कायमचा विझलो
- महेश जाधव
शब्द अनमोल आहेत
ती जपून वापरायची असतात
फ़ळ्यावरील पुसता येतात
मनातील मात्र कायम राहतात
- महेश जाधव
जग सोडून जाण्याचा
नेहमी विचार करतो
तुमची आठवण येते
आणि मी पुन्हा मागे फ़िरतो
- महेश जाधव








